प्लास्टिक विरोधी मोहिमांना गती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2022
- 479
नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहिमा तीव्रतेने राबवाव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिल्यानंतर यी मोहिमांना गती आली आहे. विविध ठिकाणी दुकानांवव छापे टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या व 51 हजारांचा दंडवसूल करण्यात आला.
सर्वच आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व विभागातील स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा गतीमानतेने राबविण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच 10 डिसेंबर रोजी तुर्भे येथे 1200 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावरील साठा जप्त करण्यात आला. अशाच प्रकारे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रात राबविल्या जात असून ऐरोली येथे सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील 7 खाद्यपदार्थ दुकानदारांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. यामधील एका दुकानदारावर दुस-यांदा कारवाई होत असल्याने 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली व सर्वांना समज देण्यात आली. याशिवाय सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील प्रत्येकी एका खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दुकानाच्या आसपास कचरा टाकल्याने प्रत्येकी रु.250 प्रमाणे रु.500 इतका दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथे सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील 4 दुकानदारांवर कारवाई करीत 20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे 3 दुकानदारांनी इतरत्र कचरा टाकल्याने प्रत्येकी रु.250 प्रमाणे रु.750 दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
नेरुळ विभागातही सेक्टर 4 येथील व्यावसायिककडून रु.5000 दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली व प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सेक्टर 3 येथील 4 दुकनदारांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने रु.250 प्रमाणे एकूण रु.1000 इतका दंड वसूल करण्यात आला. घणसोली येथेही एका व्यावसायिकाकडून रु.5000 दंड रक्कमेसोबतच त्याच्याकडील 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai