पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2022
- 702
वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र) मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी भारंबे यांनी पदभार स्विकारला. जेष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेवर अधिक भर देणार असून संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार असल्याचे भांबरे यांनी सांगितले.
आयुक्त बिपिनकुमार सिंग यांचा कार्यकाळ सप्टेंबर मध्ये संपला होता, तेव्हा या जागी अनेक अधिकार्यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मंगळवारी शासनाने राज्यभरातील वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. नवी मुंबईने मला खूप प्रेम दिले, माझ्या पोलीस कारकीर्द मधील नवी मुंबईतील अनुभव सुखद होता अशा शब्दात बिपिंकुमार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नवी मुंबई हे अत्यंत सुसंस्कृत व सुशिक्षित लोकांचे शहर असून मी माझ्या परीने गुन्हे रोखण्याचा, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
365 कोटींचे हिराँइन-अंमली पदार्थ जप्त करणे, कोट्यावधी रुपयांचा गुटखा पकडणे, चरस गांजा अशा अंमली पदार्थाची वाहतूक करणार्यांवर कारवाई करणे अशा कारवाई बिपिनकुमार यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. तर दुसरीकडे सायबर गुन्ह्यातील वाढ, साखळी चोरीच्या वाढत्या घटना, पोलीस विभाग अंतर्गत धुसफूस अशा घडामोडींमुळे त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली. बुधवारी सायंकाळी मिलिंद भारंबे यांनी बिपीनकुमार सिंग यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली. जेष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेवर अधिक भर देणार असून संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी सांगितले. सायबर गुन्हेगारीत होणारी वाढीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करीत या बाबत ठोस उपाययोजना आणि जनजागृती वर भर देणार असल्याचे सांगितले. हे शहर त्या मानाने शांत असले तरी वाढती व्हाइट कॉलर गुन्हेगारी, घरफोडी वाहन चोरी हे आव्हान असल्याचे सांगत हे आव्हान मोडून काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai