1 कोटी 17 लाखाची वीजचोरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 02, 2023
- 470
नवी मुंबई महावितरण भांडूप परिमंडळात वीजचोरी पकडण्याची मोहीम सातत्याने घेण्यात येत असून वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शामकांत बोरसे व त्यांच्या सहकार्यांनी माहे एप्रिल 2022 पासून ते आता पर्यंत वाशी विभागात 1 कोटी 17 लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याशिवाय, अनधिकृतपणे विजेचा वापर करून 51 लाख 70 हजार रुपयांचा महावितरणचा नुकसान झाला आहे.
महावितरण भांडूप परिमंडलात वीज चोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल 2022 ते आतापर्यंत महावितरणच्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे व वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली आहे. सदर तपासणीत, विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले आहे. विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार 335 प्रकरणात 1 कोटी 17 लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. या याशिवाय, विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार 72 प्रकरणात 51 लाख 70 हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार आहे म्हणून कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी वीजचोरी करणार्या ग्राहकांना दिला आहे. ग्राहकांनी वीज चोरी केल्यास त्यांच्यावर सातत्याने कडक कारवाई करण्यात येईल.तसेच मीटरची तपासणी मोहीम घेण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai