Breaking News
1. दुधात 2 बदाम भिजवून त्याची सालं काढून वाटून घ्यावे आणि थोडंसं संत्र्याचा रस घालून हात-पाय व चेहऱ्यावर लावावे. 1/2 तासानंतर धुऊन टाकावे.
2. मिश्रित त्वचेसाठी क्लींजिंग आणि नरिशिंगने कोरडे कोरडेपणा दूर होतो. जर तुम्ही घरीच फेशियल करू शकत असाल तर मुलतानी माती, मध आणि दह्याचे वापर करू शकता.
3. लिंबाच्या रसात अरेंडीचे तेल सम मात्रेत घेऊन चेहऱ्यावर मालीश करून कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.
4. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन लावून झोपायला पाहिजे. हात-पाय मऊ व चकचकीत होतात.
5. कोरडी त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मधाचा पॅक बनवून लावल्याने कोरडेपणा कमी होतो.
6. पपीतेचा गर 1/2 तासासाठी चेहरा व हातावर लावून धुऊन टाकायला पाहिजे. त्याने त्वचा चमकदार बनते.
7. टोमॅटो, गाजर व काकडीचा रस हे तिघही सम प्रमाणात घेऊन त्यात 2 लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट करून रोज 1/2 तास लावून ठेवावे नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावे.
8. मधात लिंबाचा रस मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
खानपान
1. ताजे फळ व सलाडाचे सेवन नियमितपणे केले पाहिजे.
2. चणे, मठ, मूग सारखे कडधान्याचे सेवन केले पाहिजे.
3. रात्री झोपताना 2 ग्लास दूध प्यायला पाहिजे.
4. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे.
5. सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai