खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सिडकोची 60 कोटींची गुढी

विना निविदा विद्युत ठेकेदाराला पोल उभारण्याचे अतिरिक्त काम मंजूर

नवी मुंबई ः सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी आपल्या कार्यशैलीतून अनेक यशाच्या गुढ्या उभारल्या आहेत. आपल्या या यशाचे प्रदर्शन ते निरनिराळ्या नियतकालीकांतून  व प्रसारमाध्यमातून करत असतात. अशाच एका कामाची गुढी त्यांनी 15 कोटीवरुन 75.26 कोटींवर नेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या राज्याचे लोकायुक्त संजय भाटिया करत असून या प्रकरणात सिडकोच्या दक्षता अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने या गुढी उभारण्यामागचे गुढ वाढले आहे. 

सिडकोने खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा 18 होलांचा गोल्फ कोर्स बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे सिडकोला फक्त 11 होल असलेला गोल्फ कोर्स बांधणे शक्य झाले होते. गोल्फ कोर्स बांधण्यातील अडचणी दूर झाल्याने सिडकोने पुन्हा उर्वरित गोल्फ कोर्सचे काम हाती घेतले आहे. परंतु, या कामात तेथे असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गोल्फ कोर्समधील पायाभुत सुविधांच्या विकासात अडथळा आणणाऱ्या 400 कि.व्ही. ईएचव्ही टॉवरचे स्थलांतरण करण्याचे काम हाती घेतले. सिडकोने सप्टेंबर 2021 मध्ये स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली व हे काम बीएनसी पॉवर प्रोजेक्टस लि. यांना 9 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले. 

सदर काम सुरु करण्यापुर्वी सिडकोच्या नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी दौरा केला असता खारघरमध्ये अशाप्रकारच्या विद्युत पोलांनी सिडकोची मोठी जागा व्यापली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही जागा विकली असता सिडकोला 3 हजार 29 कोटी रुपये मिळतील असा प्रस्ताव त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संंचालक संजय मुखर्जींच्या निदर्शनास आणून दिले. सदर जागा मोकळी करण्यासाठी सिडकोने आहे त्या कामाचे स्वरुप वाढवून त्यात अतिरिक्त पोल उभारण्याची तरतूद केली. सुरुवातीला 15 कोटींचे असलेले हे काम आता 75.26 कोटींपर्यंत गेले असून त्यास सिडकोच्या संचालक मंडळाने 17 फेब्रुवारी 2022 रोजी तत्काळ मंजुरीही दिली आहे. सुरुवातीला या कामात 10 पोलांचे स्थलांतरण करण्याचे नियोजन केले होते. परंतु, नवीन कामात 35 पोलांचे स्थलांतरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वाढीव कामाचे सुधारित आदेश 21 मार्च 2022 देण्यात आले असून त्याअनुषंगाने ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुखर्जी यांच्या या निर्णयाला संदेश पाटील यांनी राज्याचे लोकायुक्त संजय भाटिया यांच्याकडे आव्हान दिले आहे. लोकआयुक्तांनी सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांसह व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना नोटीस बजावली आहे. मुखर्जी यांच्या या निर्णयावर लोकायुक्त कोणता निर्णय घेतात याकडे मुखर्जींसह विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

 • सिडको दक्षता अधिकारी सक्रिय
  विद्युत ठेकेदाराला आपल्या अधिकाराचा वापर करुन वाढीव काम मंजुर केल्याची तक्रार संदीप पाटील यांनी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन दक्षता तपास अधिकारी-4 के.टी.मगरे यांनी तक्रारदार संदीप पाटील यांना त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांसह चौकशीकामी हजर राहण्यास सांगितले आहे. मुख्य दक्षता अधिकारी या तक्रारीवर कोणता निर्णय घेतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. 
 • नियमापेक्षा अतिरिक्त वाढ?
  सिडकोने 15 कोटींसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार जर एखाद्या निविदेत अतिरिक्त काम 25 टक्क्यांहून अधिक करायचे असेल तर स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे.  हे काम 15 कोटींवरुन 75.26 कोटींपर्यंत नेण्यात आले असून ही वाढ जवळजवळ 385 % असल्याने या अतिरिक्त कामास मंजुरी देताना सिडकोने नियमांचे उल्लंघन केले नाहीना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 • ठेकेदारावर मेहेरबानी का?
  सिडकोने 9 डिसेंबर 2021 रोजी ठेकेदार बीएनसी पॉवर प्रोजेक्टस लिमी. यांना कार्यादेश दिले होते. काम पुर्ण करण्याची तारीख 9 सप्टेंबर 2022 होती. 17 फेब्रुवारी 2022 रोजी सिडकोने अतिरिक्त काम मंजुर करुन ठेकेदाराला  मुदतवाढही दिली आहे. जर हे काम मुदतवाढ देवून पुर्ण करायचे होते तर नव्याने निविदाप्रक्रिया न राबविता ठेकेदारावर मुखर्जी यांनी दाखवलेल्या मेहेरबानीचे कारण काय? सवाल उपस्थित केला जात आहे. 
 • 3029 कोटींचा लाभ
  सदर विद्युत पोल स्थलांतरीत केल्याने सिडकोला विक्रिसाठी अतिरिक्त 27.37 हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे. या जमिन विक्रितून सिडकोला 3 हजार 29 कोटी रुपये मिळणार असून हा निधी विमानतळ, मेट्रो तसेच अन्य सेवा नवी मुंबईकरांना देण्यासाठी उपलब्ध होणार आहे. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट