पतीने केली पत्नीची हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 05, 2023
- 455
नवी मुंबई : सीबीडी येथे काही क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना घडल्यावर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात आला आणि घडलेली माहिती दिली. याची शहानिशा करून पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक केली आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जसबीर सिंग असे या आरोपीचे नाव असून तो आपल्या पत्नीसमवेत सीबीडी सेक्टर चार येथे राहतो. जसबीर हा आखाती देशात नोकरी करतो व अधूनमधून घरी येत असतो. या वेळी तो जानेवारीत घरी आला. तेव्हापासून तो घरीच आहे. रविवारी रात्री त्याचे व पत्नीचे काही वाद झाले. या वादातून रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने त्याने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यावर रविवारी त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले व घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. या माहितीची खात्री होताच रात्री नऊच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली व वाद कशावरून झाले याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai