मोस्ट वाँटेड आरोपी अखेर गजाआड
- by Aajchi Navi Mumbai
- May 18, 2023
- 389
नवी मुंबई : झारखंड येथील मोस्ट वान्टेड गॅगस्टर अमन सुशील श्रीवास्तव उर्फ रोहन विनोद कुमार यास दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट व झारखंड ए. टी. एस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईने केले जेरबंद केले आहे. झारखंड राज्यातील एकुण 40 गुन्हयामध्ये त्याचा सहभाग होता. 2015 पासुन त्याचा शोध सुरु होता. या फरार असलेला आरोपीला वाशी रेल्वे स्टेशन परिसरातुन सापळा रचुन अटक केली आहे.
आरोपी अमन सुशील श्रीवास्तव उर्फ रोहन विनोद कुमार (31) याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे झारखंड राज्यात दाखल असून त्यात खंडणी, खुन, बेकायदा शस्त्र बाळगणे व यु.ए.पी.ए. कायदयान्वये अनेक गुन्हे दाखल असुन झारखंड ए.टी.एस हे मागील 9 वर्षापासुन त्याचा शोध घेत होती. आरोपी आपले अस्तित्व लपविण्यासाठी भारत देशातील विविध राज्यामध्ये फिरत होता. सदर कारवाई ही पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस अधीक्षक (गुप्तवार्ता), दहशतवाद विरोधी पथक यांच्या मागदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिटचे अधिकारी / अंमलदार व झारखंड ए.टी.एस. यांच्या संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या कारवाई अन्वये करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai