23 जूनला वाशीत स्वच्छंद काव्य संगीत संध्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 19, 2023
- 395
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक जाणीव वृध्दींगत होण्याकरिता जनजागृतीपर विविध माध्यमांचा उपयोग केला जात आहे. कलेच्या माध्यमातून स्वच्छता विषयक जाणीवांना नवी झळाळी देण्याच्या दृष्टीने वैष्णो व्हिजन या कलासंस्थेच्या माध्यमातून 23 जून 2023 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सायं. 6.30 वा. मान्यवर साहित्यिक, कलावंतांच्या सहभागाने ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या' आयोजित करण्यात आलेली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 करिता आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ कवी संमेलन उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. पालिकेच्या या स्वच्छता विषयक अभिनव काव्य उपक्रमाची नोंद राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर 23 जून रोजी संपन्न होणारा साहित्य व संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश रुजविणारा ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या' हा वैष्णो व्हिजन प्रस्तुत आगळावेगळा उपक्रम मनोरंजनासोबतच प्रबोधनही करणार आहे. स्वच्छंद काव्य संगीत संध्या मध्ये सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर यांच्या एकाहून एक सरस कवितांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असून त्यासोबतच ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या मराठी अभिमान गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांच्या सुश्राव्य गीत-संगीताचा लाभही मिळणार आहे. याव्दारे काव्य आणि संगीताचा दुग्धशर्करा योग नवी मुंबईकर नागरिकांना कवितांचा ऋतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्जन्य ऋतूमध्ये घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका अस्मिता पांडे करणार असून, मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते जयू भाटकर यांच्या वैष्णो व्हिजन मार्फत या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai