पहाटेच्या शपथविधी नाट्याचा पडदा उठला
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 30, 2023
- 523
देवेंद्र फडणवीसांचे सत्य समोर येण्यासाठी केली राजकीय खेळी
मुंबई ः 2019 च्या निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत फडणवीसांनी शरद पवार यांचा राजकीय करिष्मा संपला असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याचबरोबर पवार कुटुंबावर चक्की पिसिंग म्हणत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. फडणवीस सत्तेसाठी काय करु शकतात हे वास्तव जनतेसमोर यावे म्हणून ही खेळी केल्याचा खुलासा पवार यांनी केल्याने पहाटेच्या शपथविधी नाट्यावरील पडदा उठला आहे.
गेले अनेक दिवस उपमुख्यमंत्री अप्रत्यक्षपणे पहाटेच्या शपथविधीचा खुलासा आपण योग्यवेळी करणार आहोत असे वारंवार सांगत होते. परंतु, शरद पवार यांनी पुण्याला पत्रकारांसोबत झालेल्या संवादात पहाटेच्या शपथविधी नाट्यावरील पडदा अचानकपणे उघडून विंगेतील फडणवीसांना समोर आणून पुन्हा एकदा त्यांची विकेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काय काय करु शकतात हे जनतेसमोर येणे गरजेचे होते, म्हणून ही गुगली टाकल्याचा खुलासा त्यांनी करुन फडणवीसांची राजकीय विकेट काढली की नाही याचा विचार पत्रकारांनीच करावा अशीही गुगली टाकली.
पवारांनी खेळलेल्या या राजकीय खेळीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या फडणवीसांना विरोधी पक्षनेता पदावर जावे लागले. सेना फोडून पुन्हा सत्ता मिळूनही त्यांना शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागत आहे यातच पवारांच्या फिरकीची कमाल त्यांच्या लक्षात आली असेल अशी चर्चेा राजकीय वर्तुळात आहे. पवारांच्या या खुलाशावर फडणवीस यांनी पवारांबरोबर सत्ता स्थापनेची चर्चा होऊन सरकार कसे चालवायचे याबाबत करारही झाल्याचे सांगितले. परंतु, पवार मागे हटल्याचा खुलासा त्यांनी केला. आता आलेले सत्य अर्धसत्य असून पुर्ण सत्य लवकरच बाहेर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. क्लिन बोल्ड कोणाचा?
पवारांच्या खुलाशावर फडणवीसांनी अजित पवार क्लिन बोल्ड झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर मी भुमिका बदलल्याचे फडणवीस म्हणत असतील तर दोन दिवसांनी त्यांनी चोरुन शपथ का घेतली? असा सवाल पवारांनी केला आहे. शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती आणि अजित पवारांवरील आरोपही मागे घेतले गेले नसते या जाणिवेनेच पहाटेचा शपथविधी काका-पुतण्यांनी उरकल्याचे बोलले जाते. त्यामुळे फडणवीसांनी केलेल्या खुलाशाने पवारांनी पुन्हा त्यांना तोंडघशी पाडलेच शिवाय क्लिन बोल्ड कोणाचा झाला हे शोधण्याचे काम जनतेवर सोडले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai