नवी मुंबईत पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी यशस्वी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 06, 2023
- 1208
नवी मुंबई ः कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने या शहरातील पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) सर्जरी यशस्वीपणे केल्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत उपलब्ध असलेल्या पार्किन्सन्स व इतर न्यूरॉलॉजिकल आजारांवरील उपचारांमध्ये एका नव्या युगाची सुरुवात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने केली आहे.
ज्यांच्यावर डीबीएस सर्जरी करण्यात आली ते पुरुष रुग्ण 65 वर्षे वयाचे असून घणसोली येथील रहिवासी आहेत. गेली जवळपास दहा वर्षे ते पार्किन्सन्स आजाराने त्रस्त आहेत. प्रदीर्घ काळापासून औषधे घेत असल्याने त्यांच्या शरीरात औषधांसाठी प्रतिरोध निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांना व्हीलचेयरवर बसून राहावे लागत होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले तेव्हा आधीचे सहा महिने ते अंथरुणाला खिळून होते. डीबीएस सर्जरीनंतर रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा घडून आली. चालणे आणि संतुलनासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरचे रिहॅबिलिटेशन केले जात आहे. पार्किन्सन्स रुग्णांसाठी हे रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचे आहे. हे रुग्ण आता हळूहळू का होईना पण इतर कोणाचीही मदत न घेता चालू शकत आहेत. सर्जरीनंतर त्यांची पार्किन्सन्सवरील औषधे खूप कमी झाली आहेत. तब्येत पूर्णपणे बरी होण्यासाठी सर्जरीनंतर 3 ते 6 महिने नियमितपणे प्रोग्रेसिव्ह थेरपी घेणे आवश्यक आहे.
सर्जिकल टीमचे नेतृत्व करणारे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, न्यूरोसर्जरी (स्टिरीओटॅक्टिक व फंक्शनल न्यूरोसर्जरी) डॉ अक्षत कयाल यांनी सांगितले, “पार्किन्सन्स आजार पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णांसाठी डीबीएस आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते. या क्रांतिकारी उपचार पद्धतीमुळे पार्किन्सन्स आजार वाढण्याचा वेग मंदावू शकतो व रुग्णांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. येथील कन्सल्टन्ट न्यूरॉलॉजिस्ट डॉ अनिल वेंकीटचलम म्हणाले, “पार्किन्सन्ससारख्या आजाराशी दीर्घकाळापासून सामना करत असलेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धत विशेष लाभदायक ठरते. या हॉस्पिटलचे नवी मुंबई संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, “आम्हा सर्वांसाठी हा अतिशय अभिमानस्पद क्षण आहे. हे यश मिळवून आमच्या हॉस्पिटलने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, इतकेच नव्हे तर, नवी मुंबईत उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांमध्ये देखील यामुळे खूप मोठी क्रांती घडून आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai