इर्शाळवाडीवर दरड कोसळली
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 20, 2023
- 538
खालापुर ः राज्यभरात पावसाने हाहा कार माजवला आहे. कुठे नद्यांनी पातळी ओळांडली तर कुठे पुरपरिस्थिती ओढावली. यातच रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री दुखाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत अनेकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले आहे. तर शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत.
इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली अंदाजे 40 घरं दबल्याचा अंदाज आहे. तर अंदाजे 250 ची वस्ती आहे. या दुर्घटनेत नवी मुंबईतील अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्याने मृत्यू झाला आहे. तसेच मदतकार्यात सहभागी झालेल्या ट्रेकरचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे तसेच स्थानिक आमदार महेश बालदी तातडीनं दुर्घटनास्थळी दाखल झाले. शिवाय एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली. पाऊस आणि अंधारामुळे सुरुवातीला मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र, उजाडल्यानंतर मदतकार्याला वेग आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai