मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 25, 2023
- 666
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनामत रकमेसह मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
राज्याप्रमाणे नवी मुंबईतही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोना कालावधीनंतर सर्व मंडळांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईच्या शेजारील ठाणे महापालिका आयुक्तांनीही याबाबत निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. नवी मुंबई पालिकेनेही या निर्णयाची अमंलबजावणी करुन अनामत रक्कम आणि मंडप भाडे माफ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai