अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2023
- 496
नवी मुंबई : वाशीतील रघूलीला मॉल मधील स्वच्छतागृहात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याबाबत त्याने पालकांना सांगितल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीला जेरबंद केले आहे.
योगीराज गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाशीतील रघुलीला मॉल मध्ये आरोपी आणि पीडित मुलगा यांची भेट झाली. आरोपीने पीडित मुलास तळ मजल्यावरील स्वच्छतागृहात घेऊन गेला. त्याच ठिकाणी आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. हे कृत्य केल्यावर आरोपी पळून गेला. तर मुलाने याबाबत पालकांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करील सोमवारी आरोपीला अटक केले आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai