क्रिप्टो करेंसीच्या आमिषाने फसवणुक
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 18, 2023
- 469
नवी मुंबई : क्रिप्टो करेंसीमध्ये पैसे गुंतवल्यावर अल्पवधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. वेळीच कारवाई केल्याने फसवणूक करणाऱ्याचे बँक खाती गोठवली असून त्यात 32 कोटी सहासष्ठ लाख बारा हजार एक्यानव एवढी मोठी रक्कम आहे.
बाळु सखाराम खंडागळे (वय 42 वर्षे) व राजेंद्र रामखिलावन पटेल (वय 52 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही घाटकोपर येथे राहतात. 28 एप्रिल ते 9 ऑगस्ट या कालावधीत फिर्यादी यांना अर्चना नायर असे बनावट नाव सांगणाऱ्या महिलेने क्रिप्टो करंसीमध्ये ट्रेड केल्यास मोठया प्रमाणात फायदा होत असल्याचे अमिष दाखवले होते. फिर्यादी यांना आरोपींनी दिलेल्या विविध बँक खाते मध्ये एकुण सहा कोटी बासष्ट लाख एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी भरण्यास भाग पाडले. मात्र महिन्यात परतावा सांगून कुठलाच परतावा दिला नाही तसेच संपर्क हि बंद झाल्याने फिर्यादी यांनी सायबर शाखेत गुन्हा नोंद केला सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांचे मार्फतीने चालु होता.
सायबर शाखेने तात्काळ संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्याबाबत सूचना केली आरोपीताने फसवणुकी करिता वापरलेले विविध बँक खाते गोठवून एकुण बत्तीस कोटी सहासष्ठ लाख बारा हजार एक्यानव्य ऐवढी रक्कम गोठवण्यात सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांना यश आले आहे. गुन्ह्यात वापरलेले बॅक खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता संशयीत इसमाचे घाटकोपर, मुंबई येथे वास्तव असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने सदर परिसरात शोध घेवुन बाळु सखाराम खंडागळे, राजेंद्र रामखिलावन पटेल, यांना अटक केले. आरोपीताकडे केलेल्या तपासामध्ये सदर आरोपीत यांनी त्यांचे बँक खाते तसेच बँक खातेशी संलग्न मोबाईल क्रमांक, धनादेश पुस्तक, एटीएम कार्ड हे काही लोभा पोटी गुन्हयातील पाहिजे आरोपीताकडे दिले असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अटक आरोपी हे बाहेरील राज्यातील अन्य संशयीत आरोपीतांचे संपर्कात असल्याचे निष्पन्न होत असुन त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai