वाशीच्या महाराजा मार्केटमध्ये कापडी पिशवी वेंडींग मशीन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2023
- 536
नवी मुंबई ः प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांसोबत कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात असताना सेक्टर 17, वाशी येथील महाराजा भाजी व फळ मार्केट येथे सीएसआर उपक्रमांतर्गत कापडी पिशवी वेंडींग मशीन सुविधेचे लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल नेटवर्कच्या सीएसआर उपक्रमामधून ही कापडी पिशवी वेंडिंग मशीन मार्केटच्या ठिकाणी बसविण्यात आली असून वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनवरील लाल बटण दाबल्यावर त्यामधील ॲटोमॅटीक प्रणालीव्दारे कापडी पिशवी दिली जाते. साधारणत: 5 ते 6 किलो वजन पेलू शकेल अशा क्षमतेची ही कापडी पिशवी असून जर navimumbaicity.com हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये मोफत डाऊनलोड करुन घेतल्यास ॲपमधील कोड स्कॅन केल्यानंतर मशीनव्दारे मोफत कापडी पिशवी प्राप्त होते.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 10 रुपयाचे नाणे टाकून तसेच 5 रुपयांची दोन नाणी टाकून त्याचप्रमाणे ॲपव्दारे कोड स्कॅन करुन प्रत्यक्ष पिशवी प्राप्त करुन घेतली व या मशीनची कार्यप्रणाली जाणून घेतली. नवी मुंबई सिटी डॉट कॉम सोशल नेटवर्कच्या वतीने संस्थापक मेहुल जैन व सह संस्थापक पुजा पवार व श्रुती कांबळे यांनी मशीनच्या कार्यपध्दतीची माहिती आयुक्तांना दिली.
मशीनमधून मिळणाऱ्या कापडी पिशव्यांवर यापुढील काळात संस्थेच्या कामांचा व नवी मुंबई पालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक संदेशाचा प्रचार करण्यात येईल असे संयोजकांनी सांगितले. आगामी कालावधीत इतरही मार्केटमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही सांगण्यात आले. ग्राहकांनी सोबत कापडी पिशवी आणली नसेल तर त्यांना तेथील वेंडिंग मशीनचा वापर करुन कापडी पिशवी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे विक्रेत्यांना सांगतानाच आयुक्तांनी नागरिकांशीही संवाद साधत त्यांना कापडी पिशव्यांचा वापर निग्रहपूर्वक करावा असे आवाहन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai