मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 15, 2024
- 558
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. लोक छतावर आणि मैदानावर रंगीबेरंगी पतंग उडवताना दिसतात. मकर संक्रांत आणि पतंग उडवणे याचा एकमेकांशी काय संबंध आहे? पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचं रहस्य दडलेलं असल्याचं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून या दिवशीची सूर्यकिरणे शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात, ही सूर्यकिरणे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे या दिवशीचा सुर्यप्रकाश घेणे, खूप लाभदायी ठरते.
- अनेक आजारांवर गुणकारी
थंडीच्या काळात खोकला, सर्दी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो. मकर संक्रांतीच्या दिवशीची किरणे शरीरासाठी औषधाचं काम करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहते आणि याचा शरीराला फायदा होतो. - पंतग उडवण्याची सुरुवात कशी झाली?
मान्यतेनुसार, त्रेतायुगातील मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने आपल्या भावांसह आणि हनुमानासह पतंग उडवले. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी स्नान, पूजा आणि दान यांचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी मकर संक्रांत रुहानी नक्षत्रात सुरू होत आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ मानलं जातं. याशिवाय ब्रह्मयोग आणि आनंदादी योग तयार होत आहेत, जे फलदायी मानले जातात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai