सेतुवर वाहने थांबवल्यास कारवाई अटळ
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 16, 2024
- 288
144 वाहन चालकांविरुद्ध कारवाई
उरण : शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक अर्थात अटल सेतू वर शासनाच्या, पोलीस यंत्रणेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता काही वाहन चालक आपली वाहने थांबवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होणार असल्याने कायद्याचे पालन न करणाऱ्या अशा वाहनांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईच सत्र सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसातच 264 बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अटल सेतचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले असून, या पुलावर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच अटल सेतूवर चार चाकी वाहनांकरिता वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच सदर पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास आणि वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक वाहन चालक आपली वाहने अटल सेतूवर पार्क करुन सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सदर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीस आळा घालण्याकरिता न्हावा-शेवा वाहतूक शाखाच्या वतीने विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क केलेल्या आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या250 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. कलम 122/177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी 500 ते 1500 रुपये इतक्या रवकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सागरी सेतूवर विनाकारण थांबणे अनेक वाहनचालकांना महागात पडले. अटल सेतूवर कोणीही वाहने थांबवू नयेत, असे आवाहन न्हावा-शेवा वाहतूक शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी केले आहे.
- मुंबई व नवी मंबई वाहतूक पोलिसांवर जबाबदारी
अटल सेतूच्या 10 कि.मी. 400 मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. तर उर्वरीत भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. रविवारी पोलिसांनी सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेकजण वाहन थांबवत होते. मुंबई वाहतूक पोलिसांनी सागरी सेतूवर वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी 120 वाहन चालकांवर कारवाई केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai