आठवडाभर पाणीकपात पुढे ढकलली

मुंबई ः पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेनं 7 दिवस 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 3 ते 9 डिसेंबरऐवजी आता 7 ते 13 डिसेंबर अशी एक आठवडा पाणीकपात करण्यात येणार आहे. या दिवसांमध्ये पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पाणीकपातीच्या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देभरातून लाखो अनुयायी मुंबईत येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून  पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पाणी कपात आता शनिवार, 7 ते शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार आहे. या कालावधीमध्ये पिसे उदंचन केंद्रात वेगवेगळी काम आणि दुरुस्तीही करण्यात येणार आहे.