प्रदूषणावर उपाययोजना करा

खा. राजन विचारे यांची संसदेत मागणी

नवी मुंबई शहरातील हवेचा दर्जा घसरत चालल्याने वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ही गंभीर बाब लक्षात घेऊन संसदेत शून्य प्रहरमार्गे मुद्दा सभागृहात मांडला.

नवी मुंबई शहराचे वाढते शहरीकरण व वाढणार्‍या वाहनांमुळे शहरातील प्रदूषण तसेच मोठ्या प्रमाणात कारखाने यांच्याद्वारे दूषित पाणी व दूषित वायू अनधिकृतपणे नाल्यात सोडल्याने याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने नागरिकांना अस्थमा तसेच हृदयरोगाने ग्रासलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत आहे, अशी माहिती सभागृहात दिली. त्याचबरोबर हवेमध्ये धुळीचे कण अधिक प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सर्वेक्षणामध्ये ते नवी मुंबई शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स सर्वसामान्य 0 ते 50 असायला पाहिजे; परंतु याचे प्रमाण घणसोली 90. 67, महापे 200, तुर्भे 170 एक्यूआय, तळोजा, बेलापूर या भागात प्रदूषणाचा आकडा अधिक असल्याचा आकडा सभागृहात निदर्शनास आणून दिला. येथील केमिकल कंपनी अनधिकृतपणे रात्री रासायनिक वायू व प्रदूषित पाणी नाल्याद्वारे सोडतात. त्यामुळे या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. यासाठी केंद्रीय प्रशासनाने या अनधिकृतपणे वायू व प्रदूषित पाणी सोडणार्‍या कंपनीवरती निर्बंध घालावे. असे आदेश तत्काळ देऊन त्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी सभागृहात केली.