पवईत दोन तास मतदान खोळंबले
- by Aajchi Navi Mumbai
- May 20, 2024
- 407
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पाचवा टप्पा महाराष्ट्रातील 13 ठिकाणी व देशातील एकूण 49 जागांसाठी आज सुर आहे. यात मुंबईतील पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबले होते. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलेच आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आत सोडल्याने गोंधल अजून वाढला. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान बंद असतानाच लांडेंना आत सोडलंच कसं असा सवाल विचारण्यात येतोय.
पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली आहे. त्यानंतर जवळपास तासाभराने इव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दोन तास 100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळत उभा राहिली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai