महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2024
- 420
उरण ः निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी अनमोल योगदान देणारी आणि सामाजिक दायित्व जपणारी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेने समाजात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून सारडे गावातील महिलां भगिनींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक दायित्व जपत संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातुन आणि मित्र परिवार सारडेच्या सहकार्यातून एक सुंदर कार्य साकारलं गेलं ते सारडे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते संपेश पाटील यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सारडे गावातील महिलां भगिनींना नामांकित डाबर कंपनीचे रिअल फ्रेश फ्रूट ज्युस, डाबर टूथपेस्ट, मिक्स मसाला, गुलाबजल, जास्मिन रूम फ्रेशनर, हजमोला मुखवास अशा प्रकारच्या तब्बल 230 पाकिटं,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोबतच कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती संपेश पाटील यांचे कार्यक्रमा दरम्यान महिलां भगिनींनी औक्षण करून आणि केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था आणि मित्र परिवार सारडे यांच्या माध्यामातून संपेश पाटील यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत साकारलेल्या या आदर्शवत कार्यक्रमा करिता केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, आगरी, कोळी, कराडी संघर्ष संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे, राजेश पाटील, सुभाष पाटील, ज्योत्स्ना पाटील, अल्पेश जोशी, त्रिजन पाटील आणि सारडे गावातील महिलां भगिनींचा उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai