न्हावा शेवातून 132 कंटेनर्स जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 22, 2026
- 36
उरण ः उरण तालुक्यात अनेकदा अवैध मार्गाने व चुकीची माहिती देऊन परदेशातून विविध मालाची, वस्तूची आयात केल्याचे निदर्शनास आले आहे. पुन्हा एकदा या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तस्करीविरोधातील एका मोठ्या मोहिमेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) न्हावा शेवा बंदरावर 139 कोटी रुपयांच्या चुकीची माहिती दिलेल्या मालाने भरलेले 132 कंटेनर्स जप्त केले आहेत. या रॅकेटशी संबंधित मुख्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
डीआरआय अधिकाऱ्यांनी सुमारे 3,029 मेट्रिक टन माल असलेले कंटेनर्स जप्त केले. या मालाची नोंद खोट्या पद्धतीने तूर डाळ म्हणून करण्यात आली होती. सखोल तपासानंतर असे उघड झाले की, या साठ्यांमध्ये प्रत्यक्षात टांझानिया आणि सुदानमधून आयात केलेल्या 2,710 मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया आणि कॅनडाकडून मिळवलेल्या 319 मेट्रिक टन हिरव्या वाटाण्यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लादलेल्या कडक आयात निर्बंधांना बगल देण्याच्या विशिष्ट उद्देशाने ही चुकीची माहिती देण्यात आली होती. उरण तालुक्यात न्हावा शेवा बंदर विभागात अवैध वाहतूक, अवैध साहित्य, अवैध व बेकायदेशीर माल, वस्तूची मोठया प्रमाणात कंटेनरमधून वाहतूक होत असून पुन्हा एकदा उरण मध्ये या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai