महेंद्र घरत यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2024
- 541
उरण ः 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला.
रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न दिल्याने सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. 27 ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांना भेटण्यासाठी शेलघर येथे आले असता उपस्थित हजारो कार्यकर्त्यासोबत महेंद्रशेठ घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी घरत म्हणाले की खरेतर लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता परंतु उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. या विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता परंतु याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे ओझे उचलणार नाही असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही असे ते म्हणाले. तसेच त्यांनी रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला. जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्ष किंगमेकर असेल असेही ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai