अनैतिक संबंधातून पोलीस पतीची हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2025
- 598
नवी मुंबई : जीआरपी पोलीस हवालदार विजय चव्हाण (42) यांची गळा दाबुन रेल्वे पटरीवर ढकळून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा झाला असून पोलीस हवालदार पत्नीचे अनैतिक संबंध असून तिने तिचा तिचा प्रियकर आणि आणखी दोन साथिदारांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणाऱ्या विजय रमेश चव्हाण यांचा मृतदेह घनसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे कळल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून याबद्दल गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. पाच दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. प्रियकर ब्राह्मणेने रचलेल्या कटानुसार, पानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पाटसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावून घेतले. चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पाट केली. विजय चव्हाण मद्याच्या अमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे येऊन रात्री 11.30 च्या सुमारास गळा दाबून त्यांची हत्या केली. यानंतर तिघांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या घटनेनंतर धीरज मात्र भेदरला होता. त्यामुळे ब्राह्मणेने त्याला इको वाहन घरी नेण्यास सांगितले. धीरज आपली गाडी घेऊन घरी गेला. यादरम्यान ब्राह्मणे आणि पानपाटील रेल्वे ट्रॅकशेजारीच तब्बल चार तास थांबले. सकाळी जेव्हा पहिली ट्रेन यायला लागली, तेव्हा त्यांनी चव्हाणचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवला. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकऱ्यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल कसून तपासला. तेव्हा मोबाइलमधील जीपेवरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला. या स्टॉलच्या नजीक असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्यांच्याबरोबर असलेला धीरज आढळून आला. तसेच चव्हाण यांनी शेवटचा व्हिडीओ कॉल आपल्या मित्राला केला होता, त्यातही धीरज त्यांच्या बरोबर असल्याचे आढळून आले. धीरज राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धीरज रात्री 1.30 च्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले. या सर्व पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ब्राह्मणे, पूजा आणि पानपाटील यांचा कट उघड केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai