फिल्मी स्टाइल कॉपी करणारा अटकेत
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 25, 2025
- 391
नवी मुंबई ः रायगड जिल्हा कॉ.ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (28) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे. आकाशला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
वाशी येथील फादर एंग्नल शाळेत शनिवारी रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेची क्लार्क पदाच्या भरतीची परीक्षा होती. या परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराकडून मायक्रोफोनद्वारे कॉपी होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्या सूचनेवरून निरीक्षक जहांगीर मुलानी यांच्या पथकाने परीक्षा केंद्रात धडक दिली. त्यांनी संशयित उमेदवाराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळून आला शिवाय शर्टच्या कॉलरमध्ये लपवलेला मायक्रोफोन (ब्ल्यूटूथ) देखील आढळला. आकाशने फोनमध्ये एक विशिष्ट ॲप्लिकेशन घेतले होते. त्याद्वारे त्याने प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो राहुल ठाकूर नावाच्या सहकारी व इतरांना पाठविले होते. त्यानुसार या व्यक्ती त्याला अज्ञात ठिकाणावरून मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे सांगत होती. याप्रकरणी आकाश घुनवत याच्यासह राहुल ठाकूर व इतरांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai