परिवहन उपक्रमात डिजीटल रजा प्रणालीचा वापर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 343
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात रजेची कार्यवाही सुनियोजित पध्दतीने व्हावी यादृष्टीने Leave Management System परिवहन उपक्रमात कार्यरत स्थायी, ठोक मानधन तत्वावरील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा व्यवस्थापनाचा ऑनलाईन ॲपद्वारे दि.03 फेब्रुवारी 2025 पासून 100% वापर सुरु करण्यात आलेला आहे. शासकीय कामकाजात कर्मचारी/अधिकारी यांची उपस्थिती/ अनुपस्थिती, किरकोळ रजा, अर्जित रजा व वैद्यकीय रजा यांचे कमी मनुष्यबळामध्ये अचूक नियोजनासाठी कार्यालयात रजा व्यवस्थापनाच्या दृष्टीने LMS प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा पुरेपूर वापर होत आहे.
प्रणालीचे फायदे :
1. LMS प्रणालीमुळे अधिकारी व कर्मचारी 24 तास कामगिरी करण्यास सक्रिय राहून इतर ठिकाणांहून रजा अर्ज सादर करता येतात. तसेच अधिकाऱ्यांना रजा मंजूर करता येते. त्यामुळे कामात जलदगती येऊन वेळेची बचत होत आहे.
2. LMS प्रणालीमुळे रजा अर्ज ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने कागदाचा वापर कमी होऊन त्यावरील खर्च कमी होऊन सर्व रजा दस्तऐवज डिजिटल पद्धतीने साठवला जात आहे.
3. मोबाईल ॲपद्वारे रजेच्या अर्जची स्थिती व कर्मचाऱ्याच्या हजर दिवसाची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध होत असल्याने कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन माहिती घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे.
4. LMS प्रणालीमुळे कोणत्या विभागात किती कर्मचारी रजेवर आहेत याची माहिती अचूक व जलद प्राप्त होत असल्याने मनुष्यबळाचे योग्य ते नियोजन करणे शक्य होते.
5. LMS प्रणालीमुळे रजा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे.
ई ऑफिस प्रणाली व प्रणालीमुळे परिवहन उपक्रमाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन कामाचा निपटारा जलद गतीने होत असल्याचे नमुंमपा परिवहन उपक्रम प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai