मुलीची हत्या करणारा अटकेत
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 474
भांडणाच्या रागातून मुलीच्या डोक्यात दगड घालुन हत्या
नवी मुंबई : शिरवणे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका 17 वषय अल्पवयीन मुलाने त्याच भागात राहणाऱ्या 12 वषय मुलीच्या डोक्यात दगड घालुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार दुपारपासून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह रात्री उशीरा एमआयडीसीतील डोंगराळ भागात सापडल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत या मुलीची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील मृत 12 वषय मुलगी व तिची हत्या करणारा 17 वषय मुलगा हे दोघेही शिरवणे एमआयडीसीत एकाच भागात राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांची चांगली ओळख होती. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या मुलाने सदर मुलीला आपल्या सोबत घरापासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात नेले हेते. त्याठिकाणी गेल्यानंतर मुलाने मुलीकडे शरीरसंबध करण्याची मागणी केली. मात्र मुलीने त्याला नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला, या वादानंतर झालेल्या भांडणात मुलाने रागाच्या भरात पीडित मुलीच्या डोक्यात दगड घालुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने मुलीचा मोबाईल सोबत घेऊन त्याठिकाणावरुन पळ काढला. सदर मुलगी दुपारपासून गायब झाल्याने तीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने मुलीच्या पालकांनी रात्री तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करुन बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध सुरु केला होता. या शोध मोहीमेदरम्यान रात्री उशीरा शिरवणे एमआयडीसीतील डोंगराळ भागामध्ये मुलगी जखमी अवस्थेत सापडल्याने तिला नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापुवच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच परिसरात राहणाऱ्या 17 वषय अल्पवयीन मुलाने सदर मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सदर अल्पवयीन मुलाविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- मोबाईल परत देण्यासाठी गेला आणि फसला
या घटनेतील मृत मुलीची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने बेपत्ता झालेल्या मुलीचा मोबाईल फोन त्याला रस्त्यावर भेटल्याचे सांगून सदर मोबाईल फोन तिच्या कुटुंबियांना रात्री आणुन दिला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मुलीच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. या तपासात मुलगा खोटी माहिती देत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सदर मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सदर मुलीच्या डोक्यात दोन दगड घालुन तिची हत्या केल्याची कबुली दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai