राजेंद्र कांबळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2025
- 212
उरण ः भिलकटी येथील भूमीपुत्र सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मुंबई प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी राज्यपाल महाराष्ट्र राज्य सी.पी. राधाकृष्णन, राज्यमंत्री कामगार अँड. आकाश फुंडकर, राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार अँड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग आय ए कुंदन (भा. प्र. से) यांच्या शुभहस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र पुस्तक, शाल, फेटा, रोख रक्कम पंचवीस हजार देऊन मोठ्या थाटामाटात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी तुकाराम मुंढे विकास आयुक्त, डॉ. एच.पी. तूमोड कामगार आयुक्त कल्याण रविराज इळवे, संजय थोरात ज्येष्ठ पत्रकार, प्रभाकर कांबळे, राजकुमार कांबळे, अरुण कांबळे आशिष कांबळे,नितीन खरात, कांबळे शारदा शिरसाट यांनी निवडीबद्दल राजेंद्र कांबळे यांचे अभिनंदन व कौतुक केले. राजेंद्र कांबळे यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व ठिकाणी सहभागी असल्याने त्यांना हा अष्टपैलू ठरवण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai