सायबर फसवणुक करणारे त्रिकुट जेरबंद
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2025
- 353
73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे ; 1 कोटी 81 लाख 72 हजारांचा गंडा
नवी मुंबई ः सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर असताना आज सुशिक्षित नागिरकही त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. डिजीटल अरेस्ट व टॅक्स बुडवल्याचे सांगून फसवणुक करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी टोळीचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. देशभरात त्यांच्याविरुद्ध 73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघां जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईत डॉक्टर, प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या महिलेला मोबाईलवर व्हॉटसॲपवर कॉल करुन इन्कम टॅक्सचे अधिकारी बोलत आहोत. ग्लोबल टेड्रींग कंपनी, वाजीपूर, नवी दिल्ली येथे तुमची कंपनी असून तुम्ही 8 लाख 62 हजार 230 रुपयांचा टॅक्स चोरी केल्याने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे सांगत चक्क सीबीआय, ईडी, सुप्रिम कोर्टाचे बनावट लेटरहेडची पत्रे त्यांना पाठवण्यात आली. अमित चौधरी केसमध्ये तुमच्या नावाचे क्रेडीट कार्ड सापडले आहे. त्यामुळे तुमची डिजीटल अरेस्ट केली आहे, अशी भिती सायबर गुन्हेगारांनी दाखविली. या महिलेला तुमची संपत्ती आर.बी.आय बँकेकडून व्हेरीफाय करायचे असल्याचे सांगून व्हेरीफीकेशन झाल्यानंतर पुर्ण रक्कम परत केली जाईल. त्याकरीता सर्व बँकांची खाती व शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या सर्व व्यवहाराचा तपशील व्हॉटसॲपवर पाठवण्यास सांगितला. या डॉक्टर महिलेला सायबर क्रिमिलीरने पाठविलेल्या सहा बँकांच्या खात्यावर 1 कोटी 81 लाख 72 हजार 667 परस्पर वळते केले. 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान या त्रिकुटाने अन्य साथीदारांच्या मदतीने ही फसवणुक केली होती. हा सारा प्रकार बनावट असल्याचे निदर्शसणार आल्यानंतर त्यांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेचे बँक ट्रान्झेक्शन तपासाकरीता तीन पथके तयार करीत या गुन्हयातील आरोपी रमेश शेट (पटवा) राहणार अंधेरी पश्चिम, अमिश शाह राहणार काळबादेवी रोड, राजकुमार नारंग राहणार अहमदाबाद गुजरात यांना अटक केली. या आरोपींकडे बोगस कंपन्याची कागदपत्रे व रबरी स्टॅम्प मिळाला. तिन्ही आरोपींकडून 11 लाख 35 हजाराची रोख रक्कम व हेराफेरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या आरोपींवर यापुव देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 10 बोगस कंपन्या स्थापन करुन तब्बल 36 बँकेत खाती उघडून सीबीआय, ईडी, सुप्रिम कोर्टाच्या बनावट लेटरहेड गंडा घालत होते. पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटांकडून 32 डेबिट कार्ड, 33 बँकांचे धनादेश, 18 मोबाईल फोन, असा फसवणुकीच्या गुन्हयात वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा छडा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलसि आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवत गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवार तुंगेनवार व सचिन कोकरे, सतिश भोसले, पोलीस कर्मचारी नितीन जगताप, शशिकांत शेडगे, महेश पाटील, संजय राणे, निलेश किंद्रे, अजय कदम, पुजा वैद्य या पथकाने लावला आहे.
सायबर गुन्ह्यात पहिल्यांदाच संशयित आरोपींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलम लावण्यात आले आहे. संशयित यांची मोठी टोळी असून देश विदेशात कॉल सेक्टर स्थापन करून त्यातून फोन द्वारे सावज हेरले जात होते. या संशयितांची सखोल चौकशी केली असता राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल वर त्यांच्या विरोधात 73 तक्रारी आढळून आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai