Breaking News
नवी मुंबई ः सेक्टर 44 ए नेरूळ येथे भूखंड क्र. 5 ते 9 या ठिकाणी आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट या नावाने लॉजिंग अँड बोर्डिंगचा विनापरवानगी व्यवसाय अनधिकृतपणे करण्यात येत होता. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने परवाना विभाग व पोलीस पथकाच्या सहयोगाने त्याठिकाणी धडक कारवाई करीत सदर आस्थापना सीलबंद केली.
संबंधित आस्थापनेच्या मालकास 1 एप्रिल 2025 रोजी कलम 376 अन्वये नोटीस देऊन व्यवसाय परवाना घेण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून त्यानुसार संबंधित आस्थापनेच्या मालकाने परवाना विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. तथापि सदरहू इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने संबंधितांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर दि. 20 मे 2025 रोजी सदर आस्थापना बंद करावी अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे संबंधितांस कळविण्यात आले होते. मात्र सदर आस्थापना नोटीस देऊनही सुरू ठेवल्यामुळे आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार सदर आस्थापना मोहोरबंद करण्याची कारवाई करण्यात आली.
5 जून 2025 रोजी दुपारी 3 ते 7.30 वा. कालावधीत तळमजला ते 23 मजल्यापर्यंतच्या 43 व्यावसायिक रूम्स सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाई दरम्यान सदर आस्थापनेने अनधिकृतपणे लावलेला आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट असा नामफलकही काढून टाकण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai