उद्योजकांना वैध मापन शास्त्र विभागाचे मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 212
नवी मुंबई ः नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापन शास्त्र कोकण विभागाच्या वतीने कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयातील उद्योग व आयातदार आस्थापनांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र राज्य वैध मापन शास्त्र, मुंबईचे नियंत्रक सुधाकर तेलंग (भा. प्र. से.) यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास वैध मापन शास्त्र, कोकण विभागाचे सहनियंत्रक शिवाजी काकडे, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व औद्योगिक उत्पादन/आयातदार आस्थापनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्पादक व आयातदारांनी उत्पादित/आयातीत वस्तूंवर बंधनकारक असणाऱ्या माहितीचे विवरण, विक्री प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी व ग्राहकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र वैध मापन शास्त्र नियम 2011 यानुसार सर्व उत्पादक व आयातदारांनी आपल्या वस्तूंवर आवश्यक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती, अपूर्ण तपशील किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हे नियम काटेकोरपणे लागू करण्यात आले आहेत. सत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक मापे तोलन उपकरणे वापरताना अचूकता राखणे, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे तसेच आस्थापनांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी ई-मेल व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे याबाबत मार्गदर्शन केले गेले. उत्पादन किंवा आयात केलेल्या प्रत्येक वस्तूवर उत्पादक/आयातदार यांचे पूर्ण नाव व पत्ता (पिनकोडसह), वस्तूचे नाव, वस्तूचे निव्वळ वजन/संख्या व एकक विक्री किंमत, उत्पादन/आयात केलेला महिना व वर्ष, किरकोळ विक्री किंमत, युनिट सेल प्राई, ग्राहक तक्रार क्रमांक व ई-मेल यांचे संपुर्ण माहिती देणे गरजेचे आहे.
सत्रात उद्योग प्रतिनिधींनी विविध शंका मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे निरसन केले. विशेषतः वस्तूंच्या पॅकेजिंगवरील माहिती, वजनातील अचूकता, आणि ग्राहक तक्रार निवारण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या वेळी तेलंग यांनी सांगितले की, वैध मापन शास्त्र नियमांचे पालन करणे हे प्रत्येक आस्थापनाचे कर्तव्य असून, ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी अचूक व पारदर्शक माहिती देणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai