केंद्राच्या गुप्तचर विभागाला आसुडगावमध्ये जमीन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2025
- 167
पनवेल ः केंद्र सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोला रायगड जिल्ह्यातील आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील 4 हेक्टर जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
भारताची गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो ही देशांतर्गत गुप्त माहिती गोळा करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबधित काम करते. गृह मंत्रालयाच्या अखत्यारित या संस्थेचे कार्य आहे. या विभागासाठी पनवेल तालुक्यातील आसुडगाव येथे जमिन देण्यात आली आहे. या जमिनीवर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवा-निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. आसुडगाव येथील सर्व्हे नंबर 33 पैकी 4 हेक्टर जमीन रेडीरेकनर दरानुसार येणाऱ्या किंमतीच्या 50 टक्के आकारुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जमीन उपसंचालक, सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार, मुंबई विभाग यांना भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकाराने आणि कब्जाहक्काने देण्यात येणार आहे. यासाठी काही अटी व शर्तीही घालण्यात आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai