ज्येष्ठ नागरिकांसाठी कलागुणदर्शन स्पर्धां
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 82
नवी मुंबई ः ज्येष्ठांप्रती आपुलकी जपणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांकरिता विविध सेवासुविधा पुरविण्यात येत असतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठांना त्यांचे अंगभूत गुण प्रदर्शित करता यावेत या दृष्टीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
दि. 01 ऑक्टोबर 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जात असून त्यापूर्वी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये कथाकथन, हास्य, वेशभूषा, नृत्य (व्यक्तिगत), टेलीफोन या पाच स्पर्धा 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता से.03 वाशी येथील महात्मा फुले भवन या ठिकाणी होत असून 24 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे. तसेच समुह नाटिका, एकपात्री अभिनय, गायन (वैयक्तिक), काव्यवाचन या स्पर्धांचे आयोजन 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता से.03 वाशी येथील महात्मा फुले भवन या ठिकाणी होत असून 24 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे. ब्रिझ गेम स्पर्धा 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागा गणा पाटील उद्यान, से.15, सीबीडी बेलापूर येथे होत असून 25 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचा अंतम दिनांक आहे. कॅरम स्पर्धा (एकेरी व दुहेरी) आणि बुध्दीबळ स्पर्धा दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, कै. सिताराम मास्तर उदयान, से.7 सानपाडा येथे होत असून 26सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे.
निबंध स्पर्धा सहभागासाठी ‘जीवन सुंदर आहे जगायला शिका’ या विषयावरील निबंध 26 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्जासह सादर करावयाचे आहेत. टपाल पत्र लेखन स्पर्धेमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला पत्र या विषयावरील पत्र लेखन दि. 26 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्जासह सादर करावयाचे आहे. 01 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्याकरिता दि. 26 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. या सर्व स्पर्धा, सन्मान याविषयीची सविस्तर माहिती, नियम, अटी व शर्ती तसेच अर्ज महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर भवन कार्यालय, पहिला मजला, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथे शासकीय सुट्ट्या वगळून उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातही उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिकांकरिता ही आनंदपर्वणी असून यामधील जास्तीत जास्त स्पर्धात्मक उपक्रमांत सहभागी होऊन हे उपक्रम यशस्वी करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai