राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिंदेसेनेत
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 29, 2025
- 289
नवी मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुपुत्र विनीत चंद्रकांत पाटील व सहकऱ्यांसमवेत शिवसेना शिंदेगट पक्षात जाहीर प्रवेश केला. स्थानिक प्रकल्पग्रस्त व माथाडी युनीयनमध्ये पुर्वीपासून सक्रिय असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईतील स्थानिक राजकारणात नवी समीकरण घडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्या लोकांसाठी काम करतो त्या नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी, माथाडींच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करत असताना असे जाणवले की ते लोकासांठी धावून जातात, पक्षपात न करता जनतेची कामे करतात. प्रकल्पग्रस्तांचे, अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे यांची नक्कीच मदत होईल. ज्या ठिकाणी मदत होते त्यांच्यासोबत काम केल्यास सोईस्कर होईल म्हणुन त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी विषयी किंवा कोणाविषयी कोणतीच नाराजी नसून केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी हा प्रक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. पक्षप्रवेशावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख सुरेश कुककर्णी, उपजिल्हाप्रमुख विलास भोईर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai