विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव!
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2025
- 147
केंद्राकडे राज्याचा प्रस्ताव; प्रकल्पग्रस्तांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई ः नवी मुंबई ः राज्य सरकारने 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झाला तरी विमानतळ नामकरणाचा प्रश्न अधांतरीच राहिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची हाक दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शुक्रवारी सह्याद्रीवर घेतलेल्या बैठकीत विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांच्याच नावावर मोहर उठवली. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचा तपशील त्यांनी दिल्याने प्रकल्पग्रस्त नेत्यांनी प्रस्तावित मोर्चा मागे घेत असल्याचे जाहीर केल्याने सरकारला हायसे वाटले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरोड्रोम परवान प्राप्त झाल्यानंतर विमातळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून 2016 मध्ये शिलान्यासही मोदी त्यांच्याच हस्ते करण्यात आला होता. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून प्रकल्ग्रस्त आग्रही आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करुन गेली 5 वर्षे नवी मुंबई परिसरात प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलने, मोर्चे, केले. प्रत्येकवेळी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल असे सांगून आंदोलनकर्त्यांची बोळवण सरकारने केली होती. परंतु, दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात येईल की नाही याबाबत शाश्वती नसल्याने पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त नेत्यांनी एल्गार पुकारला होता. अनेक दिशादर्शक फलक उखडण्यास स्थानिकांनी सुरुवात करुन 8 ऑक्टोबरला चक्काजाम करण्याचे व सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली होती. तत्पुर्वी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर संबंधितांसोबत शुक्रवारी बैठक बोलावली होती. यावेळी नवी मुंबई विमानतळासंदर्भात दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आले आहे. मात्र, काही तांत्रिक कारण असल्याने काहीसा वेळ लागणार आहे. पुढील तीन महिन्यात दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सरकारकडून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील नाव देण्याच्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. यामुळे विमानतळ नामकरणाच्या संदर्भात सर्वपक्षीयांकडून काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आ. प्रशांत ठाकूर, सर्वपक्षीय कृत समितीचे पदाधिकारी यांच्या सह अनेक प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.
- 8 ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन
- देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू आहे.
- उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु
- सिडको महामंडळाने उद्घाटनापूर्वी शहराचे सौंदर्य आणि सोयीसुविधा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील सहा दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश उच्च स्तरावरून देण्यात आले आहेत. तसेच दुभाजक स्वच्छ करून रंगकाम, हिरवळीसाठी रोप लागवड आणि अनधिकृत ढाबे-हॉटेल्स हटवण्याची मोहीम राबवली जात आहे.
उद्घाटनस्थळी सुमारे पाच हजार लोकांसाठी भव्य मंडप उभारला जात आहे. पार्किंग, येण्या-जाण्याची व्यवस्था आणि पाहुण्यांसाठी सुविधा याबाबत सिडको आणि स्थानिक प्रशासन बैठकांद्वारे नियोजन करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस दलासह सिडकोचा दक्षता विभाग, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तरित्या कार्यरत आहेत.
- सिडको महामंडळाने उद्घाटनापूर्वी शहराचे सौंदर्य आणि सोयीसुविधा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील सहा दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश उच्च स्तरावरून देण्यात आले आहेत. तसेच दुभाजक स्वच्छ करून रंगकाम, हिरवळीसाठी रोप लागवड आणि अनधिकृत ढाबे-हॉटेल्स हटवण्याची मोहीम राबवली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai