21 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 75
नगरराध्यक्षपदासाठी 4 अर्ज
उरण : उरण नगरपरिषद निवडणुक संदर्भात दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 48 उमेदवार अंतिम रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट टक्कर रंगणार असून, शिवसेना शिंदे गट व अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागांत बहुकोनी लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत. आता निवडणुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचारात अधिकच रंगत येणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोळी शोभा भुवन, महाविकास आघाडीकडून घाणेकर भावना कुंदन, शिंदे गटाकडून रुपाली तुषार ठाकूर, तर अपक्ष म्हणून शेख नसरीन इसरार या चार उमेदवारांची नावे अंतिम आहेत. नगरपरिषद प्रमुख पदासाठीची ही चौकोनी लढत शहराच्या राजकीय समीकरणात नवे ताण आणणारी ठरणार आहे.
नगरसेवक पदांच्या 21 जागांसाठीच्या सर्व प्रभागांची उमेदवार यादीही दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित झाली आहे . 21 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्येक प्रभागातील स्पर्धा सुटसुटीत झाली असली तरीही मतांचे तिढे व गणित गुंतागुंतीचे बनले आहेत. अनेक प्रभागांत भाजप व महाविकास आघाडी यांच्यात थेट आमनेसामने लढत दिसत असली तरी शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांचे अस्तित्व निर्णायक ठरू शकते.
उरण शहरात वेगवेगळे समस्या असून उरण शहरातील महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, हॉस्पिटल, वाढते अपघात, कचऱ्याची समस्या, विजेचा लपंडाव, रस्त्याची दुरवस्था, करप्रणाली, स्वच्छता, आरोग्यसेवा यांसारख्या महत्वाच्या स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचार तापमान कमालीचे चढणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai