हुडहुडणाऱ्या थंडीत पोपटीची मेजवानी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 62
उरण ः हिवाळ्यात शेतात वालाच्या शेंगाचा सुंगध येऊ लागला की पोपटी पार्टीचे नियोजन आपसुकच घडून येते. विशेष करुन रायगड जिल्ह्यात पोपटी पार्टींचा अक्षरक्षः धुमाकुळ पाहायला मिळतो. थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात आप्तेष्टांसोबत पोपटी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सध्या उरण आणि पनवेल तालुक्यात पोपटींची रंगत सुरु झाली असून यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
हिवाळ्याचा काळ म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी जेव्हा थंडी असते तेव्हा भाज्याही पिकतात, तेव्हा कोकणातील गावी शेतात मोकळ्या जागेत ही पोपटी शिजवली जाते. यामधील मुख्य घटक म्हणजे वालाच्या शेंगा, बटाटे, लसूण, मिरची, अंडी, चिकन, भांबुर्डीचा पाला हे साहित्या मसाले एकत्र करून एका मोठ्या मातीच्या भांड्यात भरले जातात त्याला वर भांबुर्डीच्या पाल्याने बंद केले जाते आणि ते भांडे मातीमध्ये किंवा शेकोटीत गाडले जाते. त्यामुळे त्याला एक खास चव येते. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येऊन थंडीचा आस्वाद घेतला जातो.
पोपटी पार्टी हा कोकणातील खास रिवाज आहे जो हिवाळ्यात थंडीचा आनंद घेण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आयोजित केला जातो. साधारणपणे डिसेंबर पासून पोपटी पार्टीच्या मेजवान्या रंगताना दिसून येतात. ‘पोपटी’ या नावावरूनच या पार्टीचे वैशिष्ट्य ठरते. शेतात किंवा मोकळ्या जागेवर छान शेकोटी पेटवून धमाल गप्पा जुन्या आठवणी गाण्यांच्या मैफिली रंगून ही पार्टी साजरी करतात.
पोपटी शाकाहारी तसेचकरुन शाकाहारी पोपटी केली जाते. भांबुर्डेचा पाला व ओव्याचा भाजका असा खरपूस गंध पोपटीला असल्यामुळे आणि तेल व पाणी न वापरता केलेला पदार्थ असल्यामुळे पोपटी पचायला हलकी असते. उरण तालुक्यात आता थंडी मोठया प्रमाणात असून पोपटीची पार्टी सर्वत्र होताना दिसून येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai