‘क्लोव्हर लीप’ इंटरचेंजमुळे प्रवास अधिक वेगवान
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 53
सहा महिन्यांत मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार
पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्भूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. यात विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तयार होणारा ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्प म्हणजेच ‘क्लोव्हर लीप’ अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या सहा महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. यामुळे पनवेल शहर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. हा केवळ एक पूल नसून, नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक रचनेचा कणा ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. पनवेल शहर, खंडेश्वर रेल्वे स्टेशन परिसर, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कडून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन या इंटरचेंजची रचना करण्यात आली आहे.या प्रकल्पामध्ये फुलपाखराच्या आकाराचा विना-सिग्नल उड्डाणपूल आणि जोडरस्त्यांचे मोठे जाळे तयार केले जात आहे. या उड्डाणपुलामुळे गाढी नदीवरील खाडीमार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विना-अडथळा पोहोचू शकतील, अशी या मार्गाची रचना केली आहे. ईस्टर्न इंटरचेंजच्या धर्तीवर विमानतळाच्या उलवा बाजूस वेस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. या इंटरचेंजमुळे अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने आलेल्या वाहनांना थेट विमानतळ गाठणे शक्य होणार आहे. उड्डाणपूल, गोलाकार चौक आणि उंच मार्गांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलचा विमानतळाशी अखंडित संपर्क साधला जाणार आहे. ही पायाभूत सुविधा पनवेल शहराच्या विकासाला मोठी गती देणारी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतू-पामबीच मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट पोहचता येणार आहे. कळंबोली सर्कल, खांदेथर तसेच पनवेल शहर या परिसरातील वाहनचालकांना या मार्गाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai