विकसित भारत घडविण्यासाठी ई-राष्ट्रीय परिषद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 20
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने आयसीएलईएस मोतीलाल झुनझुनवाला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशी येथे 2047 या विषयावर भव्य ई-राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही परिषद महिला विकास कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच, मुंबई यांच्या सहकार्याने पार पडली.
परिषदेचे उद्घाटन आयसीएलईएस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी.ए.राजेश झुनझुनवाला यांच्या हस्ते झाले. प्राचार्या प्रा.डॉ. अनीता गोस्वामी गिरी यांनी स्वागतपर भाषणात महिलांच्या सर्वांगीण विकासातील योगदानावर प्रकाश टाकत,परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आला होती. या परिषदेत मोठा संख्येने संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी आपले संशोधन निबंध सादर केले. या नॅशनल परिषदेकरिता एकूण 55 संशोधन निबंध प्राप्त झाल्याची माहिती दिली. प्रमुख वक्त्या डॉ. अरुणा नक्केला यांनी नवोपक्रम व उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करत संशोधन व कल्पनांना कॉपीराइट घेण्याचा सल्ला दिला, तर डॉ. गीताली इंगवले यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यावहारिक उपाय सुचवले.
परिषदेत मानव्य, वाणिज्य व विज्ञान या तीन शाखांमध्ये तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, डिजिटल समावेशन तसेच एसटीईएम क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांचे योगदान या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समारोप सत्रात प्रमुख अतिथी डॉ. किर्ती अगाशे यांनी विकसित भारताच्या निर्मितीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. तसेच संगीत व संस्कार भारतीच्या चित्रकलेसारख्या सांस्कृतिक माध्यमांतून महिलांचे योगदानही अधोरेखित करण्यात आले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजन समिती, प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. ही परिषद ज्ञानविनिमय, सहकार्य आणि प्रेरणादायी विचारांचे प्रभावी व्यासपीठ ठरली असून विकसित भारत 2047 या संकल्पनेला बळकटी देणारी ठरली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai