रबाळे गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक
- by मोना माळी-सणस
- Apr 14, 2026
- 32
अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या रागातून हत्येचा कट
नवी मुंबई ः माहिती अधिकारात अर्ज करुन अनधिकृत इमारत पाडल्याचा राग मनात ठेवून तब्बल एक वर्षाने हत्येची सुपारी देऊन हल्ला करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. हत्येच्या बदल्यात हल्लेखोरांना 10 हजार रुपये आणि 1 बीएचके घर देण्यात येणार होते. मात्र सुदैवाने गोळीबाराच्या हल्ल्यात माहिती अधिकार कार्यकर्ता अमित मौर्य आणि व्यावसायिक संदीप गवस जखमी झाले. हल्लेखोरांनी वापरलेल्या चोरीच्या दुचाकीवरुन गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली.
रबाळे पोलीस ठाणे हद्दीत 06 एप्रिल रोजी संदीप गवस व अमित मौर्या यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये अमित मोर्या हे जखमी झाले असून त्यांचेवर फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, येथे उपचार चालू आहेत. फिर्यादी संदीप गवस यांनी मोटर सायकलवरुन येवून गोळीबार करणाऱ्या अनोळखी इसमांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन रबाळे पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपासात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त. नवी मुंबई, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त. गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1. पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा. सचिन गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 मधील गुन्हे प्रकटीकरण पथके व गुन्हे शाखा, कक्ष 1/2/3 व मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांची तपासकामी वेगवेगळी पथके तयार केली. गुन्हे शाखेतील तपास पथकाने नवी मुंबई, मुंबई, ठाणे शहरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज व तांत्रिक तपासावरून गोळीबार करणारा आरोपी निष्पन्न केला. तसेच आरोपीने गुन्हा करताना वापरलेली मोटर सायकल सानपाडा पोलीस ठाणे हद्दीमधून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. मोटार सायकल चोरीचा गुन्हा सानपाडा पोलीस ठाणे येथे 04 एप्रिल रोजी दाखल आहे. तपासामध्ये मोटर सायकल चोरी करणारा आरोपी निष्पन्न करून आरोपीचा साथीदार नागेश माने याला नेरुळ येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करता त्याने राहुल सहानी याच्या सांगणेवरुन मालवणी मालाड येथे राहणारा इसम मोहम्मद सईद अल्लाउद्दीन खान याला मोटार सायकल चोरी करण्याचे काम दिल्याची माहिती दिली. सदर माहितीवरुन आरोपी मोहम्मद सईद अल्लाउद्दीन खान याला मालवणी येथून व आरोपी राहुल सद्वानी याला परेल येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपी राहुन सहानी याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा आरोपी विशाल महाडीक व गुरफान खान, दोघे रा. ऐरोली यांचे सांगणेवरून केल्याचे सांगितले. आरोपी विशाल महाडीक व गुरफान खान यांचा फिर्यादी यांचेबरोबर असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तसेच जखमी अमित मौर्या याने 1 वर्षापुर्वी अर्ज करुन मनपामार्फत त्यांची अनधिकृत इमारत पाडल्याचा राग असल्याने रोखा रक्कम 10,000 रुपये व 1 फ्लॅट देण्याच्या मोबदल्यात त्याने यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राने चार राउंड फायर करून गंभीर जखमी केले. सदर गुन्हयात 05 आरोपींना अटक केली असुन त्यांना 17 एप्रिल पर्यंत 2026 रोजी पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा तपास रबाळे पोलीस ठाणे करीत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस