डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 31
भव्य मिरवणूक व विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन 14 एप्रिल रोजी करण्यात आले. त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी सात वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी याठिकाणी खास तयार करण्यात आलेल्या,भारताच्या संविधान शिल्पाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर लेझीम, ढोल-बॅण्ड पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तीन चित्ररथ तयार करण्यात आले होते. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले लेझीम पथके. या मिरवणुकीत एकूण 17 लेझिम पथकांनी सहभाग घेतला. मिरवणुकीचा समारोप आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ करण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर व विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
- उरण तालुक्यात उत्साहात साजरी
उरण ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. यानंतर उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai