तीन बांगलादेशींना कारावासाची शिक्षा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 29
नवी मुंबई ः भारतीय सीमेत अनधिकृतपणे प्रवेश करून नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना बेलापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता. 22) दोषी ठरवले आहे. या तिघांना प्रत्येकी एक वर्ष चार महिने साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मकरंद मांडवगडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
आयशा इर्शाद शेख (40), रुबीना इर्शाद शेख (19) हुसेन ऊर्फ सागर सज्जाद शेख (25) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. वाशी पोलिसांनी 15 जानेवारी 2025 ला जुहूगाव परिसरात धाड टाकून बेकायदा वास्तव्यास असलेल्या या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणताही वैध परवाना, पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे तपासात आढळून आले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनी बांगलादेशचे नागरिक असल्याचे कबूल केल्याल्यानंतर वाशी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या तिघांवर बेलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी युक्तिवाद करताना अनधिकृत घुसखोरी ही देशाअंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने पुराव्याअंती तिन्ही आरोपींना दोषी धरीत शिक्षा ठोठावली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही आरोपींना बांगलादेश दूतावासाच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने नवी मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील रेश्मा शेख ही फरार असून, तिच्याविरोधात स्वतंत्र खटला चालवण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai