पनवेल एसटी डेपो मार्गी लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 39
पनवेल ः येथील एसटी डेपोचे बांधकाम दीर्घकाळ प्रलंबित राहिले होते. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. आ. प्रशांत ठाकूर यांनी या प्रकरणी पुढाकार घेतलाअसून संबंधित अधिकारी, एसटी प्रशासन व कंत्राटदारांसोबत सविस्तर बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. तसेच डेपो परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे लवकरच हा प्रलंति प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईहून पुणे, कोकण, सातारा, सांगली व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाण्यासाठी पनवेल एसटी डेपो महत्वाचा मानला जातो. सुमारे 40 हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पातून दररोज 18 हजारांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली जाते. तिकीट महसुलातून दररोज साडेसात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे मुंबई विभागातील हे एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे आगार मानले जाते. मात्र येथील असुविधांमुळे प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. अनेक वर्षांपासून या डेपोचे नुतनीकरणे आणि सुभोभिकरण प्रलंबित राहिले आहे. त्याचा फटका प्रवाशी वर्गाला बसत आहे. विमानतळ प्राधिकरणाची मर्यादा, पर्यावरणीय परवानग्या आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब झाला होता. मात्र, आता सर्व अडथळे दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने काम पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. पनवेल बस आगाराच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेताना आमदार प्रशांत ठाकूर, सोबत महाव्यवस्थापक दिनेश महाजन आणि इतर अधिकारी. पनवेल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पनवेल बस आगाराच्या विस्तारीकरण प्रकल्पाला अखेर गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, 2028 च्या मे महिन्यातील महाराष्ट्र दिनीतरी नव्या आगारातून बस सेवा सुरू करा. यासाठी सूरक्षित आणि वेगाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरूवारी एमएसआरटीसीचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. यासाठी तातडीने नियोजन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.
16 महिन्यांपूर्वी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन हे आगाराचे विकास काम लवकरच करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. पनवेल महापालिकेकडून आवश्यक बांधकाम परवानगी न मिळाल्यामुळे प्रकल्प रखडल्याचे समोर आले. याबाबत गुरुवारी आगारातच आयोजित आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस एमएसआरटीसीचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. या बैठकीत आमदार ठाकूर यांनी बहुमजली आधुनिक इमारतीत बस आगारासह वाणिज्य संकुल उभारण्याचा आराखडा दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले. 2028 -2029 च्या महाराष्ट्र दिनी नव्या आगारातून बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणासाठी आवश्यक अर्ज अद्याप दाखल न झाल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले. पुढील सात दिवसांत हा अर्ज सादर करून बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात आगारातील 55 टक्के जागा मोकळी करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढील 60 दिवसात प्रत्यक्ष इमारत मोकळी करण्याचे काम करण्याचे या बैठकीत ठरले. त्यानंतर संबंधित धोकादायक इमारतीचे पावसाळ्यात पाडकाम करण्याचेही ठरले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या शेड, स्वच्छ शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच प्रकाश व्यवस्था आणि चालण्यायोग्य रस्ते उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस महापौर नितीन पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai