‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेस ठरत आहे वरदान
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 27
उरण ः उरण नगरपरिषद संचलित माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या श्रीकांत सांगोलकर या विद्यार्थ्याची नवी मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते श्रीकांतचा सत्कार करण्यात आला.
सदर अभ्यासिका तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीकांत सांगोलकर याने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासिकेतील विद्यार्थ्याने मिळविलेले हे 10 वे यश आहे. यापूर्वीही या अभ्यासिकेतील 9 विद्यार्थी एमपीएससी, पोलीस, तलाठी, मुंबई महापालिका, खाजगी कंपन्या, अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत. श्रीकांतच्या या निवडीमुळे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकांत याने आपले मनोगत व्यक्त करताना उरणमधील ही एकमेव अभ्यासिका आहे तीथे आम्हाला वेळेचे बंधन नाही त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा उद्देश सफल होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करताना ग्रंथपाल संतोष पवार, सहाय्यक जयेश वत्सराज यांचे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी ॲड निरंतर सावंत यांनी श्रिकांतला मार्गदर्शन करताना सांगीतले आता थांबायचे नाही.जयेश वत्सराज यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले, ग्रंथपाल संतोष पवार यांनी श्रिकांतची जीद्द , चिकाटी आणि परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छेच्या जोरावर श्रिकांतने हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले. वाचनालयाच्या वतीने श्रिकांत आणि त्याच्या सतत पाठिशी खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या आई बाबांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी श्रीकांत सांगोलकर याचे अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासिकेस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. आणि अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार नगरपरिषदेमार्फत यापुढेही विद्यार्थ्यांसाठी इन्व्हर्टर व ईतर सुविधा अधिक सक्षमपणे पुरविल्या जातील, अशी ग्वाही नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai