उरणच्या 8 खेळाडूंची महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 18
उरण ः औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. 12 वर्षांखालील गट: वरदा आसरकर, शिवांश तांडेल, 15 वर्षांखालील गट: अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील, 18 वर्षांखालील गट: सुरज करण. सीनियर गर्ल्स गट: स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या खेळाडूंच्या यशामागे श्री स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द यामुळेच उरणच्या खेळाडूंनी ही गरुडझेप घेतली आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरावा अशी अपेक्षा आणि विश्वस्ताने क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- ऋषी पंजवानी याची आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
उरण ः स्टॉर्म फिटनेस चचअ अँड चा विद्यार्थी ऋषी पंजवानी याने ओडिशा येथे आयोजित इंडिया ज्युनिअर नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याची आता आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऋषीने ही निवड मिळवली असून, त्याच्या कठोर परिश्रम, शिस्त, समर्पण आणि जिद्दीचे हे फळ आहे. त्याच्या या यशामुळे स्टॉर्म फिटनेस अँड चचअ चा तसेच उरण शहर तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. याप्रसंगी स्टॉर्म फिटनेस अँड चचअ चे प्रशिक्षक, पदाधिकारी आणि सदस्यांनी ऋषीचे अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.देशाचे प्रतिनिधित्व करताना तो उत्कृष्ट कामगिरी करून भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.ऋषी पंजवानीचे हे यश युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे असून, क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या खेळाडू क्रीडा पट्टू साठी एक आदर्श उदाहरण आहे.ऋषी पंजवानी याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai