बेलापुर गावात उभारले अत्याधुनिक भाजी मार्केट
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 27
आ. मंदा म्हात्रे यांनी दिला 40 लाखांचा आमदार निधी
नवी मुंबई : बेलापूर गावात आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सुमारे 40 लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले भव्य भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. या अत्याधुनिक भाजी मार्केटचे लोकार्पण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यामुले स्थानिक नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाल्याने ग्राहकांसह सर्व व्यावसायिक बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याबरोबरच पारंपरिक गावांचाही सर्वांगीण विकास व्हावा आणि स्थानिक व्यावसायिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज व्यवसायाची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या आधुनिक भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. या नव्या मार्केटमुळे बेलापुर गावातील ग्रामस्थ, कष्टकरी माता-भगिनी आणि भाजी विक्रेत्यांना हक्काची व व्यवस्थित सुविधा असलेली जागा उपलब्ध झाली असून, ग्राहकांनाही एकाच छताखाली स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार वातावरणात खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच बेलापूर गावाच्या विकासाला या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला नगरसेविका पूनम पाटील, नगरसेवक अमित पाटील, माजी नगरसेवक दिना पाटील, संदेश पाटील, नरेश पाटील, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव गायकवाड, प्रभाकर कांबळे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, हरियाणा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष बलबीर सिंग चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला मंडळांच्या सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक भाजी विक्रेते उपस्थित होते. यावेळी बेलापूर गावाचा सर्वांगीण कायापालट करून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai