खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 23
उरण ः उलवे नोड मधील सेक्टर 24 ,25 ,25 अ मध्ये रस्त्यांची अवस्था फार खराब झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजत नाही. त्यात पावसाचे दिवस असल्याने पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे मनसेने सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
सेक्टर 24 ,25 ,25 अ मध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. पावसाळा सुरु असून खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक लहान मोठे अपघात झाले असून या खड्ड्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाले. याचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. याप्रकरणी उलवे नोड मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व स्थानिक महिलांनी सिडको अधिकारी योगेश गोसावी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. एखादा अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ते सुरक्षेला व नागरिकांच्या आरोग्य व जीवनाला सर्वोच्च प्राधान्य देत मनसेने निवेदन देत त्वरित रस्ते, खड्डे दुरुस्तीची मागणी केली आहे.
या प्रसंगी महत्वाची समस्या लक्षात घेता सिडको अधिकारी योगेश गोसावी यांनी लवकरात लवकर सर्व खड्डे भरण्यात येतील असे आश्वासन दिले. परंतु खड्डे न भरल्यास रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai