फ्री होल्ड धोरणाच्या अमंलबजावणीची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 25
नवी मुंबई ः नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच सिडकोच्या अखत्यारीतील लीज होल्ड इमारती फ्री होल्ड करण्याबाबत तातडीने शासन निर्णय काढावा, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील हजारो प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिक अनेक वर्षांपासून लीज होल्ड धोरणामुळे मालमत्तेची खरेदी-विक्री, हस्तांतरण, वारसाहक्क तसेच कर्जप्रकरणांमध्ये विविध अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर पूर्ण मालकी हक्क मिळावा आणि व्यवहार सुलभ व्हावेत, यासाठी फ्री होल्ड धोरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही या विषयावर विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, 2018 मध्ये राज्य शासनाने यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतरही अद्याप शासन निर्णय जारी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने जी.आर. काढावा, अशी आग्रही मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai