उरण बायपासचे डांबरीकरण पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 15
उरण ः उरणच्या बाह्यवळण (बायपास) मार्गाच्या डांबरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले. त्यामुळे लवकरच शहरातील वाहतूक कोंडीतून उरणकरांची सुटका होणार आहे. सिडकोने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उरणच्या वाहतूक कोंडीत गेल्या काही वर्षांपासून प्रचंड भर पडली आहे. यावर उपाय म्हणून सिडकोने उरण ते पनवेल मार्गावर पेट्रोल पंप ते उरण मोरा मार्ग असा बाह्यवळण रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. 2008 पासून रखडलेल्या या मार्गाचे काम आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे उरणच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे. लोकल, जलमार्ग यामुळे नागरिकांची वस्ती येथे वाढत आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. उरणच्या सर्व मार्गांवर सततच्या कोंडीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. त्यामुळे हा बाह्यवळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली. या मार्गाचे काम वेगाने व्हावे याकरिता आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा केला. तर उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. आता या बाह्यवळण मार्गाचा खर्च 60 कोटींवर गेला आहे.
सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यातील उरण नगर परिषदेच्या हद्दीतील मार्गाचे काम झाले नसले तरी उरण-पनवेल मार्गावरील पेट्रोल पंप ते धुळीवाडा या मार्गाने उरण शहर व मोरा परिसरात प्रवास करता येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai