आयसीएल महाविद्यालयात करिअर संसद सदस्य निवड व शपथविधी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 22
नवी मुंबई : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया करिअर कट्टा उपक्रमांतर्गत, वाशी येथील आयसीएलई मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयात करिअर संसद सदस्यांची निवड आणि शपथविधी समारंभ उत्साहात पार पडला.
राज्यातील सर्व महाविद्यालयांत एकाच वेळी आयोजित या ऑनलाइन कार्यक्रमात केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, डीएसपी गोगटे आणि सहायक कमांडर चेतन शेलोटकर यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास व सामाजिक बांधिलकीचे धडे दिले. त्यानंतर महाविद्यालयात प्राचार्या प्रा.डॉ.अनीता एस.गोस्वामी-गिरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचा शपथविधी सोहळा पार पडला.
या करिअर संसदेत अथर्व जाधव (मुख्यमंत्री), श्रेया पाटील (नियोजन मंत्री), गार्गी कांबळे (कायदे मंत्री), खुशबू चौधरी (सामान्य प्रशासन मंत्री), रक्षिता कोळी (माहिती व प्रसारण मंत्री), सना खान (उद्योजकता मंत्री), सेजल सिद्धार्थ (रोजगार मंत्री), महेश जौराठ (कौशल्य विकास मंत्री), प्रतिमा भागवणे (संसदीय कामकाज मंत्री), झेबा मन्सुरी (महिला व बालकल्याण मंत्री) आणि रोहन बोधेरे (सदस्य) यांची निवड करण्यात आली.
यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सी. ए. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्या डॉ. गोस्वामी-गिरी यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देत हे व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नेतृत्व गुण जोपासण्यासाठी प्रभावी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास मोठा संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai